रुग्णालयात असलेल्या माजी आमदार कुलकर्णींच्या पत्नीला अजितदादांनी केली ३ लाखांची मदत

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखाची मदत केली आहे.स्वप्नगंधा कुलकर्णी आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही बाब अजितदादांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी मुलुंड येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यांची मुलगी अमेरिकेत आहे.त्यांच्या फॅमिली फ्रेंड सध्या त्यांची काळजी घेत आहेत. कुलकर्णी यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समजल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, “गुरुनाथ कुलकर्णी आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले होते. त्यांच्या पत्नी आजारी असल्याचे समजले. पक्षासाठी कष्ट केलेल्या नेत्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. नेत्यांच्या पश्चात्य कुटुंबाला मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like