हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आसाम व गुवाहाटी येथील स्थितीबाबत काळ काही विधाने केली. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केले. “शरद पवार हे आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असे पवार यांनी म्हंटले.
अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही आताही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार टिकवायचे असून, या सरकारकडे सर्व बहुमत आहे. संध्याकाळी शरद पवार प्रफुल्ल पटेलयांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे जाणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकारने उत्तम काम केले आहे.
शरद पवार हे आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आमची लायकी नाही. त्यांनी सांगितल्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहणं राष्ट्रवादीचे काम आहे. राज्याबाहेर काय घडत त्यावर इतर बोलतील. माझा संबंध महाराष्ट्रापुरता आहेमी असे पवार यांनी म्हंटले.