हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी महत्वपूर्ण विधान केले. “आम्ही सगळ्यांनी विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी भूमिका घेतली गेली. न्यायालयात अडचण आली म्हणून आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टात ते फेटाळले. केंद्र सरकारने कायदा करुन 50 टक्केवर आरक्षण द्यायला लागेल. आम्हाला काही अभिमान नाही का ? आम्ही काय मराठ्यांच्या पोटाचे नाही का?, असे म्हणत पवार यांनी एका प्रष्णांवर प्रतिप्रश्न केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवनेरी या ठिकाणी जाऊन कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, शिवबांनी काय शिकवल आहे. सगळ्या जातींना पुढे घेऊन जायचे आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. काही भागात जाट आरक्षण, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ आरक्षण मागितले जात आहे. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रश्न पवार यांनी भरसभेत केला.
यावेळी पवार पुढे म्हणाले की, कायदा आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. काही राज्यात वेगवेगळं आरक्षण मागितले जाते. बाळसााहेब थोरात यांच्यासह आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे 12 मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते, असे पवार यांनी सांगितले.
तुम्ही काय सुपारी घेऊन आलात का?
शिवनेरी या ठिकाणी भे कार्यक्रमातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाषण सुरू असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची माहिती देण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असे पवार म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यावर अजित पवार संतापले. त्यांनी तुम्ही सुपारी घेऊन आलात का? असा सवाल केला.