Saturday, January 28, 2023

अजित पवार भाजपात येणार की नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठे वक्तव्य

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्वादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा अधून मधून कानावर पडत असते. अजित पवार (Ajit Pawar) भाजपात येणार की नाही? या प्रश्नावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठे वक्तव्य केले. तसेच त्यांनी यावेळी त्यांचे कौतुकसुद्धा केले.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
अजित पवार भाजपात येतील की नाही यावर मी भाष्य करणार नाही. ते मोठे नेते असून त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत असे वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. विकासात्मक कामात त्यांच सरकारला नेहमीच सहकार्य असत आणि हेच महाराष्ट्राला अभिप्रेत आहे या शब्दांत विखे पाटलांनी अजित पवारांच (Ajit Pawar) कौतुकसुद्धा केले आहे.

- Advertisement -

अजित पवारांच्या (Ajit Pawar) मनात काय आहे‌‌? हे माहीत नाही. मात्र, काळाच्या ओघात ते लोकांच्या समोर येईलच. विकासात्मक कामात त्यांचे सरकारला नेहमीच सहकार्य असते. तसेच द्वेषाने आणि व्यक्तिगत राजकारण करण्याची त्यांची भूमिका नसते. विरोधाला विरोध करणे ही विरोधी पक्षनेत्यांची भुमिका कधी राहिली नाही. ते विरोधाला विरोध न करता विकासात्मक राजकारण करणारे नेते आहेत. हेच महाराष्ट्राला अभिप्रेत आहे.ते (Ajit Pawar) भाजपात येतील की नाही ‌याबाबत मी भाष्य करणार नाही मात्र ते मोठे नेते असून त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!