अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा; शरद पवारांना थेट आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 36 समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार आहोत असं अजित पवार यांनी म्हंटल. शपथविधी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही शिंदे सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमचा निर्णय सर्वाना मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहे. पुढील निवडणुका ते पक्षाच्या चिन्हावरच लढवणार आहेत. जिल्हा पंचायत ते लोकसभा निवडणूकही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे असेही अजित पवार यांनी म्हंटल.

यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवं, असं आमचं मत आहे. आज संपूर्ण देशभरात विरोधक मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत, पण त्यांच्यात एकी नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली देश मजबूत होत आहे असं अजित पवारांनी म्हंटल.