ALERT! Twitter ला त्वरित करा अपडेट, कंपनीने युझर्सना दिली सिक्योरिटी वॉर्निंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या अँड्रॉईड युझर्सना सिक्योरिटी मेसेजद्वारे सतर्क केले आहे. ट्विटरने अनेक युझर्सना आपले अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे. वास्तविक साइटवर एक बग समोर आला आहे. या बगमुळे युझर्सचा प्रायवेट मेसेज (डीएम) उघडला जात आहे. या बगमुळे अँड्रॉइड 8 आणि अँड्रॉइड 9 युझर्सचे नुकसान होत आहे. कंपनीच्या मते, 96 टक्के अँड्रॉइड ट्विटर युझर्सकडे आधीपासूनच अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच आहेत जे अशा बगपासून त्यांचे संरक्षण करतात. ट्विटरला बुधवारीच अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये असलेला एक मोठा सिक्योरिटी फ्लॉ आढळला आहे.

4% युझर्स या बगने प्रभावित
तथापि, ट्विटरने असा दावा केला आहे की या त्रुटीचा फायदा घेतल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत आणि ते वेळेत सापडले. ट्विटरने म्हटले आहे की, एकूण ट्विटर युझर्स पैकी सुमारे 4 टक्के युझर्सवर याचा परिणाम झाला असून या युझर्सना सिक्योरिटी नोटिफिकेशन पाठविण्यात आलेल्या आहेत. या युझर्सना अ‍ॅप उघडल्या नंतर अलर्ट दिसून येत आहे, ज्यामध्ये अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युझर्सनी आपल्या ट्विटर अ‍ॅपला लेटेस्ट वर्जन मध्ये अपडेट केले पाहिजे, ज्यामध्ये हा बग काढला गेला आहे.

हा बग टाळण्यासाठी ट्विटर अपडेट करा
कंपनी म्हणाली, “आपला ट्विटर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, कृपया सर्व Android डिव्हाइसवर ट्विटरचे लेटेस्ट वर्जन अपडेट करा. यामुळे, बगचा iOS किंवा Twitter.com वर परिणाम झालेला नाही. या बगला 2018 मध्येच फिक्स केले गेले होते, मात्र अजुनही बऱ्याच युझर्सनी त्यांचे अ‍ॅप अपडेट करण्याची आवश्यकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात युझर्सच्या डेटाविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अलीकडेच ट्विटरवर आतापर्यंतची सर्वात मोठी हॅकिंग झाली आहे. यावेळी अनेक हाय प्रोफाइल खाती हॅक झाली. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, एलोन मस्क आणि रॅपर कायन वेस्ट यांच्यासह 130 हाई-प्रोफाइल सेलिब्रिटी, राजकारणी आणि बिझनेस अकाउंट्सचा समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like