हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुष्कळ लोकांना फुलझाडे आणि रोपे लावण्याची आवड आहे. त्यांना त्यांच्या बागेत किंवा कुंड्यांमध्ये विविध प्रकारच्या फुलांची लागवड करायला आवडते. परंतु जेव्हा आपण एखाद्या झाडास फुलांचे रोपटे समजून त्यास पाणी देता आणि नंतर आपल्याला हे समजते की ते फूलझाड नाही तर दुसरेच काहीतरी आहे. अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेबरोबरही घडली आहे, जिचे नाव आहे कॅली चॅपमन. या महिलेकडे एक अतिशय सुंदर रोपटे होते, ज्याची ती गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रेमाने काळजी घेत होती. मात्र या रोपट्या मागचे सत्य काहीतरी वेगळेच होते.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एक दिवस कॅलीला समजले की, ती ज्या रोपट्याची काळजी घेत आहे ती खरोखरची नसून प्लास्टिकची बनलेली आहे. तेव्हा या रोपट्याचे सत्य स्वीकारणे तिच्यासाठी खूपच कठीण गेले. पण हे सत्य समजल्यानंतर ती महिला स्तब्ध झाली आणि फेसबुकवर ही संपूर्ण घटना शेअर केली. यासह तिने या रोपट्याची काही छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.
रोज पाणी द्यायची
कॅलीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्याकडे मागील दोन वर्षांपासून एक रोपटे होते, जे मला खूप आवडले होते. मी हे हिरवेगार रोपटे माझ्या स्वयंपाकघरच्या खिडकीवर ठेवले. मी दररोज त्यास पाणी द्यायचे. माझ्याव्यतिरिक्त दुसर्या कोणीही त्याला पाणी दिले तर मी त्यांच्यावर भडकायचे. पण एक दिवस जेव्हा मला कळले की ते प्लास्टिकचे आहे तर खरे नाही, तेव्हा मला वाटले की, माझ्या आयुष्याची दोन वर्षे वाया गेली आहेत.
‘दोन वर्षांपासून रोपट्याची घेतली काळजी’
त्या महिलेने पुढे लिहिले की, “एक दिवस मी या सुंदर रोपट्यासाठी एक सुंदर नवीन फ्लॉवरपॉट आणला. मात्र जेव्हा मी जुन्या फ्लॉवरपॉटवरून तो बाहेर काढला तेव्हा मला धक्काच बसला. तेव्हा मला कळले की हे खोटे आहे. कॅलीने पुढे लिहिलं आहे की, ‘मी दोन वर्षं या रोपट्यावर खूप प्रेम केलं. मी प्रत्येक दिवशी त्याची पाने स्वच्छ करायचे. याची काळजी घेण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.
लोकांनी दिलासा दिला
कॅलीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. यावरुन बर्याच युझर्सनी त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे आणि असे म्हटले आहे की असे कोणाच्याही बाबतीत घडू शकते म्हणूनच त्यांनी दुःखी होण्याची गरज नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.