व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील इंधन दरवाढ, महागाई, ओबीसी राजकीय आरक्षण आदी मुद्यांवरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. हे सरकार हत्यारे आहे. नुसता या सरकारने टाईमपास केला आहे. तर ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजपा महाराष्ट्र ‘प्रदेश कार्यसमितीची आज बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी भाजपचा श्वास आहे. आम्ही आरक्षणाची मागणी केली मात्र, याकडे या सरकारने दुर्लक्ष केले आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ते सोडवायचे टाकले हे ठाकरे सरकार फक्त झोपा काढत आहे. एकंदरीत पाहता ता ठाकरे सरकारने मे महिन्यात जनतेला एप्रिल फुल्ल केले आहे.

यावेळी फडणवीस यांनी इंधन दरवाढीवरूनही मिशन साधला. ते म्हणाले की, इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर अधिक आहे. इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार आहे. माझा आता मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंना प्रश्न आहे कि त्यांनी सांगावे कि इंधनावर केंद्राचा टॅक्स आहे 19 आणि राज्याचा आहे 29 रुपये आहे. मग सांगा महागाई कोणामुळे आहे? यांना लाजच वाटत नाही. पेट्रोल डिझेलवरील टॅक्समुळे महागाई आहे ती या राज्य सरकारमुळे आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.