शेजारणीने शिवीगाळ केल्यामुळे 11 वर्षीय मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

Khadak Police Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 11 वर्षीय मुलाने शुल्लक कारणावरून गळफास (boy killed himself) घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन खडक पोलीस ठाण्यात मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चंद्रकांत कांबळे आणि साधना चंद्रकांत कांबळे अशी आरोपी मायलेकींची नावे आहेत.

दोन्ही कुटुंबामध्ये जुना वाद
आरोपी मायलेकी आणि मृत मुलाचे (boy killed himself) कुटुंबीय शेजारी शेजारी राहतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होता. याच वादातून आरोपी मायलेकी मृत मुलाचा राग राग करत होते.

मायलेकिंनी शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात मुलाचे कृत्य
मृत मुलगा 11 ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी मायलेकींच्या घरी गेला होता. यावेळी विद्या कांबळे आणि साधना कांबळे या मायलेकिंनी त्याला शिवीगाळ केली. यानंतर याचा राग मनात धरून या मुलाने गळफास (boy killed himself) घेत आत्महत्या केली.

आई-वडिलांना मानसिक धक्का
मृत मुलाचे वडील एका कंपनीत कामगार आहेत, तर आई गृहिणी आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू (boy killed himself) झाल्याने आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विद्या कांबळे आणि साधना कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती