संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यात covid-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन लागणार अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र विरोधी पक्षांसह नागरिकांनी लॉक डाऊनला विरोध केला. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा सुद्धा समावेश होता. मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या लॉक डाऊन संदर्भात आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

आनंद महिंद्रा हे ट्विटरवर ॲक्टिव असतात. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘ संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. अथक परिश्रम करणाऱ्या दुकान मालकानं बद्दल मला वाईट वाटते आता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून हे निर्बंधही लवकरात लवकर उठवण्यात येईल असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान यापूर्वी लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेणार असे सांगितले होते तेव्हा मात्र आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊन च्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांनी एक ट्वीट केले होते. त्यांनी म्हंटले होते, लॉकडाऊनचा त्रास केवळ गरीबांना आणि छोट्या व्यावसायिकांना होत असतो लॉकडाऊन हे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असते. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असे त्यांनी म्हंटले होते. मात्र आता त्यांनी नव्या घोषित केलेल्या कडक निर्बंध बाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment