हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ‘ड्राइव्ह बॉम्ब’ सादर केले. त्यातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केल्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. “फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, दगलबाज आहेत. मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी कमी पडतील असा माणूस आहे, अशी टीका गोटे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जे काही पेन ड्राइव्ह सादर करून त्यातून खुलासा करीत आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांच्या विरोधात मी तक्रार केली आहे. अशा प्रकारे कुणाचेही कुणाला संभाषण ऐकता येत नाही. ते जाहीर तर करताच येत नाही. पण त्यांनी चोरासारखे ऐकले. लबाडासारखे रेकॉर्ड केले. त्यांनी रेकॉर्डिंग हे खोट्या पद्धतीने केले. काही तरी तोडमोड करून, आमचा आवाज तोडमोड करून केले आहे.
फडणवीसांनी जे काही कृत्य केली आहरेत. ती कृत्ये ही केवळ गुन्हेगारच करू शकतो. या संभाषणानुसार आम्ही काही केले असते तर ते खरेच ठरले असते. मात्र, आम्ही काहीही केलेले नाही. आणि काही झालेच नाही. मी माझ्या केससाठी गेलो होतो. तिथे त्यांनी कॅमेरे लावले. उद्या त्यांच्या घरी कुणी कॅमेरे लावले तर चालेल का त्यांना? असा सवाल अनिल गोटे यांनी केला.