राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. देसाई यांनी आपल्या फेसबुकद्वारे म्हंटल आहे कि, एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे.

देसाई यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्या नेमक्या कोणत्या नेत्यावर आरोप करणार, त्यामुळे राजकीय धुरळा उडणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/3876050299151530

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

Leave a Comment