फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | चीन आणि भारत यांच्यात मंगळवारी सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेनंत देशभर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र अशात अनुराग कश्यप याचे एक ट्विट चांगलेच वादाचा विषय ठरले आहे. फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल अशा आशयाचे ट्विट करत कश्यप यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनुराग कश्यप नेहमीच आपल्या वादग्रस्त भुमिकांमुळे चर्चेत असतात. आता “शेवटी सर्वजण देशद्रोही होतील आणि केवळ एकच देशभक्त शिल्लक राहील. जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल” असे ट्विट कश्यप यांनी केले आहे. नेटिझन्सनी कश्यप यांना यावरुन चांगलेच ट्रोल केले आहे

दरन्यान, सैनिक माझे विधान वाचतील तेव्हा तेसुद्धा असंच म्हणतील. सैनिकांचे कुटुंबियही असेच म्हणत अाहेत. कारण गुहेत बसलेला माणुस कोणाचाच नाहीये. जर गुहेत लपलेला माणुस भिऊन असं लपला नसता तर आज कोणाचाच प्राण गेला नसता असा टोलाही अनुराग यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

Leave a Comment