नवी दिल्ली | तुम्हाला वर्ल्ड बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी कॉल आला आहे का … जर तुम्हांला असा काही कॉल आला असेल तर ताबडतोब सावधगिरी बाळगा कारण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. फसवणूक करणार्यांनी आता आरबीआयच्या नावावर फसवणूक करण्यास सुरवात केली आहे. खुल्या वर्ल्ड बँकेने अशा प्रकारच्या फसवणूकीचा इशारा दिला आहे. World Bank ने सांगितले की, जारी केलेल्या कार्डांवर World Bank चा LOGO आणि नावही वापरण्यात आले आहे.
World Bank डेबिट / क्रेडिट कार्ड जारी करत नाही
World Bank ला जेव्हा असे कळले की भारतात अशा प्रकारच्या फसवणूकीची प्रकरणे समोर येत आहेत, तेव्हा या संदर्भात बँकेने एक एडवाइजरी जारी केली. अशा प्रकारच्या घोटाळ्याबद्दल World Bank ने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये बँकेने म्हटले आहे की, World Bank कडून कोणतेही क्रेडिट व डेबिट कार्ड दिले जात नाहीत.
बँक कोणत्याही गटाची नाही
World Bank ने असे म्हटले आहे की,आमचा अशा कोणत्याही व्यक्तीशी किंवा गटाशी कोणताही संबंध नाही, किंवा आमच्या वतीने असे कोणत्याही प्रकारचे कार्ड दिले जात नाही. दिलेली सर्व कार्डे बनावट आहेत.
बँकेची अधिकृत साइट तपासा
इशारा देताना World Bank ने असे म्हटले आहे की, सर्व ग्राहकांनी अशा फसवणूकीपासून सावध राहिले पाहिजे. या व्यतिरिक्त, World Bank ने असेही सांगितले की, आमच्या धोरणांविषयी आणि कार्यक्रमांबद्दल माहितीसाठी आपण आमच्या वेबसाइट www.Worldbank.Org वर भेट देऊ शकता.
फसवणूकीची प्रकरणे दररोज वाढत आहेत
यावेळी देशात ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणे वाढतच आहेत. डिजिटल पेमेंट जितक्या वेगाने वाढत आहे, तितक्याच वेगाने ऑनलाइन फसवणूकीच्या घटनाही वाढत आहेत. ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेउयात-
ऑनलाईन बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी काय करावे-
> ग्राहकांनी त्यांचे पर्सनल डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नयेत.
> तसेच तुमचा एटीएम पिन, सीव्हीव्ही क्रमांक आणि बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका.
> एटीएम पिन वेळोवेळी बदलला पाहिजे.
> मेसेज मध्ये आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
> अधिकृत साइटवरूनच इंटरनेट बँकिंग वापरा.
> आपल्या कार्डाचे डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नका.
> तुमच्या खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाला असल्यास बँकेला त्वरित माहिती द्या.
> कोणाच्याही संशयास्पद ई-मेलवर क्लिक करु नका, ज्यात कोट्यवधींची लॉटरी लागली असल्याचे सांगितले गेले असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.