हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला. मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. चांदिवली येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला पक्ष, नेता, सर्व झेंडे बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन देखील केले.
धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? असा सवाल त्यांनी मुस्लीम समाजाला करत धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो असे ओवेसी यांनी म्हंटल.
आमची रॅली होणार म्हटल्यावर मुंबईत 144 कलम लागू केलं. आता राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. तेव्हाही 144 कलम लावणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार आहात? असा सवाल करतानाच राहुल गांधी येतील तेव्हा ओमिक्रॉनची चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमिक्रॉनची चर्चा होते, असा हल्ला ओवैसी यांनी चढवला.