हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. मात्र, ठाकरे सरकारकडून मलिक याचा राजीनामा घेतला जात नसल्याने यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. तरीही केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा सरकारमध्ये बसलेल घेत नाहीत. दुख: तर उद्धव ठाकरे यात सहभागी आहेत. हा तर ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा म्हणावा लागे,” अशी टीका शेलार यांनी केली.
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडी दिली असून जामीन मंजूर केलेला नाही याचा अर्थ न्यायालयसुद्धा सक्षमपणे काम करत आहे. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे.
आम्ही मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चाचे काढणार आहोत. या मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी न दिल्यास परवानगीशिवाय मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी शेलार यांनी दिला आहे.