“मविआ सरकारच्या भयंकर कटाच्या वघनाट्यापुढचे बरेच अंक बाकी”; आशिष शेलार यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकारच्या भयंकर कटाचे “वघनाट्य” उघड करुन ठाकरे सरकारचे त्यांनी “वस्त्रहरण” केले. अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत !,” असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भाजपच्या विराट मोर्चास उपस्थिती लावली. तत्पूर्वी शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “लाव रे तो व्हिडीओ”काय असतो ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले! सरकारच्या भयंकर कटाचे “वघनाट्य” उघड करुन ठाकरे सरकारचे त्यांनी “वस्त्रहरण” केले. या नाटकातील “तात्या सरपंच” कोण? “मंजुळाबाई”कोण? “गोप्या”कोण? “मास्तर” कोण? अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत !,” असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

यावेळी शेलार यांनी माध्यमांशीही संवाद साधला. नवाब मलिक याची दहशतवाद्यांना पाठींबा दिला आहे. दाऊदशी जो व्यवहार करो तो मंत्रिमंडळात कसा काय बसू शकतो. हसीना पारकरबरोबर बैठका घेणाऱ्याला मंत्रिमंडळात कसे स्थान मिळू शकतो. दाऊदच्या दलाला डोक्यावर बसवून हा महाराष्ट्र चालवणाऱ्याना आम्ही धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी शेलार यांनी दिला.