म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

1
37
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या सारखे वाटते असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. या आधीच अशोक चव्हाण यांनी कोणताच कॉंग्रेस आमदार पक्ष सोडून जाणार नाही असे म्हणले होते. मात्र आता त्यांनी त्या विधानाला स्व:ताच खोडून काढल्याचे चित्र सध्या दिसते आहे.

लोकसभा निवडणूक आटपली कि लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. अशा अवस्थेत कॉंग्रेसचे आमदार फोडून राज्यातील कॉंग्रेस खिळखिळी बनवण्याची रणनीती भाजपच्या गोटात आखली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here