फोडाफोडीचे धंदे केल्यामुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत; भातखळकरांची टीका  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या एका विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढण्यास मदत झाली, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले. पवारांच्या या विधानावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. “फोडाफोडीचे धंदे केल्यामुळेच पंतप्रधान होऊ शकले नाहीत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “माझं ‘ते’ एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं, असा सत्तास्थापनेच्या गुपिताचा खुलासा शरद पवारांनी केला आहे म्हणे. यात पवारांच्या कुटिलतेपेक्षा शिवसेनेची सत्तेसाठी लाचारी वरचढ ठरली. आयुष्यभर हेच फोडाफोडीचे धंदे केल्यामुळे ते कधीच पंतप्रधान होऊ शकले नाहीत, अशी टीका भातखलकर यांनी केली.

नेमके काय म्हणाले शरद पवार –

मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण सेना आणि भाजपमधील अंतर वाढवण्याबाबत एक वाक्य म्हंटल्याचे सांगितले. “तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपाकडे बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसलं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता जे सत्तेत येऊ पाहत आहेत त्यांना बाजूला करायचं असेन तर त्यांना सोयीची भूमिका घेणं शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं, असे पवार यांनी सांगितले.