“उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…”; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिशा सलियन खून प्रकरणी वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अशा या खुनशी ठाकरे सरकारचा निषेध आम्ही करत आहोत, असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…दिशा सालीयन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात FIR. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा, असे आवाहन केले होते. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर आज प्रत्यक्ष मंत्री नारायण राणे, नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.