हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले,” आपण दिल्ली काबीज करु’ असे म्हंटले. तसेच आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले. त्याच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी” मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. “ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, असे ट्विटमध्ये भातखळकर यांनी म्हंटले आहे.
ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत. pic.twitter.com/pXVCjV83CR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका क्रीडासंकुलाची स्वागत कमानीवर विर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधीतून झाल्याचा उल्लेख आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे कॅप्शन भातखळकर यांनी फोटोवर दिले आहे.
शाळा सुरू ही करायच्या आणि मुलांना उपस्थितीचे बंधन नाही असे परस्पर विरोधी विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायचे.
महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि मुख्यमंत्री घरात बसून दिल्लीवर स्वारी करणार आहेत. pic.twitter.com/ZwtIDpvvwG— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 24, 2022
आदित्य ठाकरेंवरही साधला निशाणा
भातखळकर यांनी ट्विट करीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शाळा सुरू ही करायच्या आणि मुलांना उपस्थितीचे बंधन नाही असे परस्पर विरोधी विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायचे. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि मुख्यमंत्री घरात बसून दिल्लीवर स्वारी करणार आहेत, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.