मराठ्यांना आरक्षण देण्यावर मुंबईत सर्व पक्षीय बैठक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thumbnail 1532783008122

मुंबई | मराठा आरक्षणावर राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सदर बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण देण्यावर सर्व पक्षाचे एकमत झाले आहे. मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यातसाठी अध्यक्षांना विनंती करणे, मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावणे या मुद्द्यावर सर्व पक्षीयांचे … Read more

पाणीपुरीवर आली बंदी

Thumbnail 1532769089363 2

बडोदा | पाणीपुरी लोकांच्या पसंतीला उतरलेला पदार्थ. रत्यावर, बागेबाहेर कोठेही फेरफटका मारायला गेले की पाणीपुरी आपल्याला भेटतेच. आपणाला ही ती खाल्ल्या वाचून राहवत नाही. परंतु याच पाणीपुरी विक्रीवर बडोद्याच्या पालिकाप्रशासनाने बंदी घातली आहे. सध्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव शहरभर पसरला आहे. यावर प्रतिबंध म्हणून हा निर्णय घेतला आहे असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

आंबोली घाटात दुर्घटना ३३जण जागीच ठार.

Thumbnail 1532770799008

आंबोली | कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस आंबोली घाटामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात ३३ लोक जागीच ठार झाले असून फक्त एका व्यक्तीस जीवित वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. चालका सहित गाडीत ३४ लोक बसलेले होते. पावसाळ्यात आंबोली घाटात दुसर प्रकाश असतो त्यातून असे अपघात उदभवतात. कोल्हापूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबोली घाट लागतो. घाट २० किमीचा असून गाडी … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

Thumbnail 1532757320799

कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी … Read more

मराठा आरक्षणाची चर्चा बंद खोलीत नकोच – छत्रपती संभाजीराजे भोसले

Thumbnail 1532756455448

कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मध्यस्ती करण्याची विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांना सर्व स्तरातून केली जात होती. त्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी शिवशाहू महाराष्ट्र दौरा काढून समजुन घेतला आहे. २०११ पासून मी आरक्षणाच्या लढाईत समाजासोबत आहे असे संभाजीराजे म्हणाले. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना … Read more

नितीन गडकरींच्या मध्यस्थीने अवजड वाहनांचा संप मागे

Thumbnail 1532756421774

नवी दिल्ली | मागील काही दिवसापासून सुरू असलेला अवजड वाहनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उच्चस्तर समिती नेमल्याने संप मागे घेत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेल दरवाढ, महामार्गावर पोलिसाकडून केली जाणारी पिळवणूक, आर.टी.ओ. अधिकाऱ्याकडून केली जाणारी छळनुक या मुद्द्यावर अवजड वाहन चालक संघटनांनी संप पुकारला होता. नितीन गडकरी यांनी संपकऱ्यांशी बातचीत केल्यावर … Read more

एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक

Thumbnail 1532756262762

चेन्नई | द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. करुणानिधी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. करुणानिधी हे यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत. मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते तेव्हा त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. करुणानिधी यांची प्रकृति अचानक … Read more

सरकारला आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही – प्रकाश आंबेडकर

Thumbnail 1532710501255

नंदुरबार | मराठा, पटेल, जाट, गुज्जर यांच्या आरक्षण प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. आरक्षणाच्या तिड्यावर राज्यवार अहवाल केंद्रीय गृह खात्याने मागवले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेकरांनी सूचक विधान केले आहे. जर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत तशी तरतूद नाही त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असे आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन … Read more

धनंजय मुंडेंनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र

Thumbnail 1532710335241

मुंबई | धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अटकेत असलेल्या तसेच गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींचे गुन्हे मागे घेण्याची मागणी या पत्रा द्वारे केली आहे. महाराष्ट्र भर आंदोलन तीव्र झाले असून अनेक ठिकाणी आंदोलकांची धर पकड सुरू झाली आहे. एका ठाणे शहरात ५० हुन अधिक लोकांना अटक करण्यात आली … Read more

मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनेल – हेमा मालिनी

Thumbnail 1532684792464

बांसवाडा (राजस्थान) | ‘मी जर ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते परंतु मुख्यमंत्री बनल्यानंतर स्वातंत्र्यावर बंधने येतात म्हणून मी हा निर्णय घेत नाही’ असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांनी केले आहे. हेमा मालिनी बांसवाडा येथे आल्या असता एका स्थानिक पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी असे विधान केले आहे. … Read more