हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करण्या आले. यावेळी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. “नवाब मलिक यांच्यावर अटक करण्याची कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे सरकारमधील मंत्री, नेत्यांना अटक करून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप विरोधात बोलणार्याना आदींची भीती दाखवली जाते,” अशी टीका थोरात यांनी केली.
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपा विरोधात विरोधकांमधील एखादा नेता किंवा मंत्री बोलला तर त्याला ईडीची भिती दाखवली जाते. काही लोकांना मुद्दाम त्रास देण्यात येतो. कारण कोणीही विरोधात बोलले की त्याला अटकाव केल्याचे देशात पाहायला मिळते.
अशा प्रकारच्या ईडीसारख्या या यंत्रणा दुसरीकडे वापरायच्या असतात. परंतु भाजपाकडून चुकीचा वापर केला जात ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तिथं भाजप सरकार त्रास देत असल्याचे दिसत आहे, असेही थोरात यांनी म्हंटले.