मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लवकरच या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यामध्ये जवळजवळ 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे तुमची जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर करून पूर्ण करून घ्यावी लागतील. या महिन्यात नाताळ, नवीन वर्ष, व्यतिरिक्त इतर अनेक दिवशी बँका डिसेंबरमध्ये बंद (Bank Holiday) राहणार आहेत. पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
या तारखांना बँकेला सुटी
डिसेंबर महिन्याच्या बँक हॉलिडे कॅलेंडरवर नजर टाकल्यास 3, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 रोजी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल, तर 4, 10 रविवार साप्ताहिक आहेत. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता 11, 24, 25 रोजी सुटी असेल. यावेळी ख्रिसमस रविवारी आला आहे.
बँकेत जाण्याआधी सुट्टीची यादी तपासा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या डिसेंबर 2022 च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांसह (Bank Holiday) महिन्यातील सुमारे अर्धे दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामुळे लोकांनी ही यादी तपासूनच घराबाहेर पडणे योग्य ठरेल.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..