हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. खाजगी क्षेत्रातील HDFC Bank आणि IDFC First Bank च्या ग्राहकांना नवीन वर्षात मोठा झटका बसला आहे. आता या बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली आहे. MCLR वाढल्याने आता बँकेकडून होम, ऑटो आणि पर्सनल लोन घेणे महागणार आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे.
IDFC First Bank कडून कर्जावरील व्याज दर 15-20 बेसिस पॉईंट्सने तर एचडीएफसी बँकेने 20-25 बेसिस पॉइंट्सने वाढवले आहेत. HDFC बँकेचे हे नवीन व्याजदर 7 जानेवारी 2023 पासून तर IDFC फर्स्ट बँकेचे हे नवीन व्याजदर 8 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. Bank Loan
HDFC बँक MCLR दर
HDFC बँकेने एका दिवसासाठी MCLR 8.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याच प्रमाणे आता बँकेने 1 महिन्यासाठी MCLR 8.55%, 3 महिन्यांसाठी 8.60%, 6 महिन्यांसाठी 8.70%, 1 वर्षासाठी 8.85%, 2 वर्षांसाठी 8.95% आणि 3 वर्षांसाठी 9.05% केला आहे. Bank Loan
IDFC फर्स्ट बँक MCLR दर
IDFC फर्स्ट बँकेने ओव्हरनाईटसाठीचा MCLR 8.40 टक्क्यांनी वाढवला आहे. त्याच प्रमाणे आता बँकेने 1 महिन्यासाठीचा MCLR 8.40 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.70 टक्के, 6 महिन्यांसाठी 9.15 टक्के आणि 1 वर्षासाठी 9.50 टक्के केला आहे. Bank Loan
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank Loan
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/content/dam/idfcfirstbank/footer/mclr.pdf
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे