नवी दिल्ली । देशातील तिसर्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (BoB) बुधवारी आपल्या कर्जाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने विविध कालावधीसाठी ‘मार्जिनल कॉस्ट मनी-बेस्ड लेन्डिंग रेट’ (MCRL) मध्ये 0.05 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली. बँक ऑफ बडोदाने शेअर बाजाराला सांगितले की, बँकेने 12 नोव्हेंबर 2020 पासून लागू असलेल्या ‘मार्जिनल कॉस्ट मनी-बेस्ड लेन्डिंग रेट’ (MCRL) सुधार केला आहे.
आता दरमहा होईल बचत
आता सुधारित एका वर्षाखालील MCRL 7.5 टक्क्यांऐवजी 7.45 टक्के असेल. ऑटो, रिटेल, हाऊसिंग अशा सर्व ग्राहकांच्या कर्जासाठी हा दर प्रमाणित MCRL एका दिवसापासून सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील 6.60 वरून 7.30 टक्के करण्यात आला आहे.
HDFC ने निवेदन प्रसिद्ध केले
HDFC ने एक निवेदनात म्हटले आहे की, ते आपले रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 10 बेस पॉईंटने कमी करीत आहे. एचडीएफसी RPLR च्या आधारे आपल्या होम लोन वरील फ्लोटिंग रेट्स ठरवते. म्हणजेच, RPLR हा त्याचा बेंचमार्क लेंडिग रेट आहे. HDFC च्या वेबसाइटनुसार होम लोन वरील व्याज दर 6.90 पासून सुरू होत आहे.
सर्व ग्राहकांना लाभ मिळेल
HDFC ने कमी केलेल्या कर्जाच्या रेटचा फायदा सर्व विद्यमान तसेच नवीन ग्राहकांना होईल.
Canara bank ने ही व्याज दर कमी केले
सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स (MCLR) 0.05 वरून 0.15 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. बदललेले हे दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेच्या 1 वर्षाच्या कर्जावर MCLR मध्ये 0.05 टक्के कपात करण्यात आली आहे. आता हे नवीन दर 7.40 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.
युनियन बँकेनेही कमी केले होमलोन
युनियन बँक ऑफ इंडियानेही होमलोन स्वस्त केले आहेत. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 0.10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. महिला अर्जदारांना अशा कर्जावरील व्याज दरामध्ये 0.05 टक्क्यांहून अधिक सूट मिळणार आहे. अशा प्रकारे महिला अर्जदारांसाठी 0.15 टक्के स्वस्त व्याज दर मिळेल.
बँकेने ही सुविधा दिली
याशिवाय युनियन बँक असेही म्हटले आहे की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत होम लोन वरील प्रोसेसिंग फीसही कमी केली आहे. होमलोन घेतल्यास 10 हजार रुपयांपर्यंतची सवलतही बँकेने देऊ केली आहे. 1 नोव्हेंबर 2020 पासून ही सूट लागू आहे असे बँकेने म्हटले आहे.
MCRL म्हणजे काय ?
बँकांना कर्ज देण्याचे व्याज दर निश्चित करण्याच्या सूत्रांचे नाव मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लेन्डिंग रेट (MCRL) आहे. वास्तविक, बँकांसाठी आरबीआयने निश्चित केलेले सूत्र हे फंडाच्या अत्यल्प खर्चावर आधारित आहे. या सूत्राचा उद्देश ग्राहकांना कमी व्याज दराचा लाभ देणे आणि बँकांसाठी व्याज दर निश्चित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा आहे. एप्रिल 2016 पासून, नवीन सूत्रानुसार बँका मार्जिनल कॉस्ट वरून लेंडिंग रेट चा निर्णय घेत आहेत. तसेच बँकांना दरमहा MCRL ची माहिती द्यावी लागते. आरबीआयने जारी केलेल्या या नियमांमुळे बँकांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल आणि आर्थिक विकासालाही फायदा होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.