हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशातील सर्व लोकांची आर्थिक परिस्थिती सध्या खालावली आहे.कुठे एखाद्याचा व्यवसाय रखडला आहे तर कुठेतरी एखाद्याचा पगार कापला जात आहे.त्याचबरोबरच बर्याच बँका आता ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करत आहेत.ईटीच्या अहवालानुसार, अॅक्सिस बँकेच्या अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे की सुमारे दोन लाख ग्राहकांची क्रेडिट लिमिट कमी केली गेली आहे. हा मेमो ईटीने पाहिला आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून ही मर्यादा कमी करण्यात आली. अॅक्सिस बँकेच्या काही ग्राहकांनी याची पुष्टी केली आहे.या गटासाठी पत मर्यादा ३०-९०% ने कमी केली आहे.
क्रेडिट लिमिटमध्ये ९०% कपात
अॅक्सिस बँकेच्या एका ग्राहकाने ईटीला सांगितले की त्यांच्या अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डावरील क्रेडिट लिमिट पाच लाखांवरून कमी करुन केवळ ५०,००० रुपये इतकी करण्यात आली आहे,जे कि ते थकबाकी वेळेवर भरत आहेत.कस्टमर केयरमध्ये विचारणा केली असता असे सांगितले गेले की तांत्रिक अडचणीमुळे हे घडले आणि काही दिवसात ते सुधारले जाईल. दुसर्या ग्राहकाने सांगितले की, त्याची मर्यादा सात लाखांवरून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्षअंबुज चंदना म्हणतात की सध्याच्या परिस्थितीत काही विशेष कारवाई झाली असेल असे नाही. क्रेडिट कार्ड खर्च आणि परतफेडनुसार आम्ही ग्राहकांच्या क्रेक्रेडिट लिमिटचा निर्णय घेतो आणि काही बाबतींत ती वाढ किंवा कमी होते.
गेल्या महिन्यात क्रेडिट कार्डची शिल्लक बरीच वाढली
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीच्या शेवटी क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम १.१ लाख कोटी रुपये इतकी होती. जानेवारीअखेर देशात ५.६ कोटी पेक्षा जास्त ऍक्टिव्ह क्रेडिट कार्ड होते. एचडीएफसी बँकेने वैयक्तिक कर्जासाठीची असलेली पात्रता अट कडक केली आहे आणि लिमिट देखील कमी केली आहे. आता त्याची मर्यादा अर्जदाराच्या वार्षिक पगाराच्या ७०-८०% पर्यंत कमी केली गेली आहे, तर आधी ती १००% एवढी होती.
केवळ या किरकोळ विक्रेत्यांना बँका कर्ज देत आहेत
बँका किरकोळ विक्रेते आणि व्यापारी एंटरप्राइझ ओव्हरड्राफ्टसाठी कर्ज कमी करत आहेत. एचडीएफसी बँकेच्या इंटरनल मेमो शाखा व्यवस्थापकांना असे आदेश देण्यात आले आहेत की पुढील आदेश येईपर्यंत केवळ किराणा दुकान, फार्मसी आणि दुग्धशाळांनाच कर्ज दिले जावे. ईटीने हा मेमो पाहिला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात SBI देतेय एमरजंसी लोन! जाणुन घ्या प्रक्रिया
वाचा सविस्तर????????https://t.co/y9gXAsjZvz#lockdownextension #SBI #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.