हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक बँकांनी त्यांची रोख शिल्लक आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक रक्कम शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच या बँकांमध्ये आता तीन विनामूल्य व्यवहारानंतर देखील शुल्क आकारले जाईल. हे शुल्क 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेत लागू होईल. बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व बचत खातेधारकांना आता त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात किमान 2 हजार रुपये ठेवणे आवश्यक असणार आहे, जे आधी 1,500 रुपये होते. आता उर्वरित रक्कम ही 2,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये तर अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये आकारेल.
बँक ऑफ महाराष्ट्र – बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर जमा आणि पैसे काढण्यासाठी 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल. तसेच, लॉकरसाठी जमा रक्कम कमी केली गेली आहे परंतु लॉकरवरील दंड मात्र वाढविला गेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आणि कमीत कमी लोकांना बँकेत आणण्यासाठी बँक सध्या हे सर्व करीत आहे. तसेच बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.
अॅक्सिस बँक – अॅक्सिस बँकेच्या खातेदारांना आता आपल्या ईसीएस व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. ईसीएस व्यवहारांवर पूर्वी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. या खासगी बँकेने 10 / 20 रुपये आणि 50 च्या बंडलसाठी प्रति बंडल 100 रुपये हँडलिंग फी आणली आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या बचत आणि कॉर्पोरेट वेतन खातेधारकांनी पैसे काढल्यानंतर – डेबिट कार्ड – कोटक महिंद्रा बँकेतुन एटीएम मधून महिन्यातून पाच वेळा रोख रक्कम काढण्यासाठी 20 रुपये आणि विना आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. जर या खात्यात शिल्लक कमी असताना ट्रांजेक्शन अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाईल. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांनी आता आपल्या खात्यात श्रेणीनुसार किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त, प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रति व्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.