क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे.

या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाबू नलावडे (वय-47 रा. धोलवड, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. बुधवारी।ओझर संघ व जांबुत संघ यांच्यात सामना सुरु होता. ओझर संघाची बॅटिंग सुरु असताना नॉन स्ट्रईकवर उभ्या असलेल्या बाबू नलावडे हा अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळला.

मैदानावरील खेळाडू आणि नागरिकांनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मयत बाबू नलावडे हे परिसरातील एक नामवंत खेळाडू होते. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसापासून या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरु आहेत.
ते सामने सुरू असतानाचं ही घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment