चीनी कंपन्यांसोबतच्या कोट्यावधी रुपयांच्या कराराबाबतचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनची उत्पादने आणि चिनी कंपन्या यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात विरोध केला जात आहे. आयपीएलचा प्रायोजक असलेल्या विवोबरोबरचा करार संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयसाठी सोशल मीडियावर तीव्र दबाव आणला जातो आहे. मात्र, मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, आयपीएलमध्ये चिनी कंपनीकडून येणाऱ्या पैशांचा फायदा हा चीनला होत नसून भारताला होतो आहे. पण आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने जाहीर केले आहे की चिनी कंपन्यांसोबतच्या विद्यमान करारावर पुढील आठवड्यात बैठक घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. या बैठकीत चिनी कंपन्यांशी झालेल्या कराराचे भविष्य ठरवले जाईल. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयला चिनी कंपन्यांकडून कोट्यावधी रुपये मिळतात.

चिनी कंपन्यांमुळे भारताचा फायदा
लडाखच्या सीमेवर असलेल्या गालवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सैनिकी तणावानंतर भारतात चीनविरोधी वातावरण चांगलेच तापलेले आहे. भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसाचारात गेल्या चार दशकांपेक्षा जास्त कालावधीत पहिल्यांदाच किमान 20 भारतीय सैनिक शहीद झाले. तेव्हापासून देशभर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. धुमाळ म्हणाले की, चिनी कंपन्यांकडून आयपीएलसारख्या स्पर्धेच्या प्रायोजकत्वाचा देशाला फायदाच होतो आहे. बीसीसीआयला वीवोकडून वर्षाकाठी 440 कोटी रुपये मिळतात, त्याद्वारे 2022 मध्ये पंचवार्षिक करार संपुष्टात येईल.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी एक दिवस आधी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, आता बीसीसीआय भविष्यात स्टेडियम किंवा काहीही बांधण्याचे कंत्राट कोणत्याही चिनी कंपनीला देणार नाही. जर सरकारने त्यांना हा करार संपुष्टात आणण्यास सांगितले तर बीसीसीआय ते संपुष्टात आणण्यास अजिबात संकोच करणार नाही, असेही धुमाळ यांनी यावेळी म्हटले होते. अरुण धुमाळ म्हणाले की, एक भारतीय म्हणून चीनला धडा शिकवण्यासाठी आणि जास्तीत जास्त वेदना होत असलेल्या ठिकाणी दुखापत केली पाहिजे. त्यांचा माल खरेदी न करता आर्थिकदृष्ट्या त्यांना कमी केले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.