सावधान! रात्रीचे शिळे अन्न खाताय ?? तर हे वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। शिळे अन्न हे आपल्या आरोग्यासाठी कधीच फायदेशीर नसते. त्यामुळे पचन क्रिया ही पूर्णतः बिघडते. असे कित्येक पदार्थ आहेत, की त्याचा वापर दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्यासाठी केला जातो. असे कोणकोणते पदार्थ आहेत, की ते दुसऱ्या दिवशी खाऊ नयेत. जाणून घेऊया त्याबद्धल….

बीट – बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या बीटला पुन्हा तापवूनही खाल्ल्याने आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. आपण बीट फ्रिजमध्ये ठेवू शकता, परंतु बाहेर काढल्यानंतर त्याला गरम करू नका, आपण ताबडतोब ते खाऊ शकता.

शिळे मांस – रात्रीचे शिळे चिकन आणि अंडी खाणे शकतो टाळावे कारण या गोष्टींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. शिळे चिकन आणि अंडी पुन्हा शिजवून खाल्ल्याने त्यातल्या प्रथिने मध्ये हा बदलावं होतो, जर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

बटाटा – आपल्या बर्‍याच पाककृतींमध्ये बटाटा हा सर्रास वापरला जातो, म्हणून त्याला भाज्यांचा राजा देखील म्हणतात, परंतु उरलेली बटाट्याची भाजी गरम करून खाल्ल्यास आपल्याला पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. शिळ्या बटाटामध्ये पोषक घटक नष्ट होतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’