‘…तर म्हणूनच विराट हा जगातील नंबर एकचा फलंदाज आहे’- सुनील गावस्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज आहे. तो मैदानावर वेगाने धावाही करतो आहे आणि बर्‍याचदा अनेक दिग्गज त्याची चर्चाही करतात. अलीकडेच माजी खेळाडू सुनील गावस्करनेही विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

विराट कोहली आज अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज असल्याचे कारण सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्करने विराट कोहलीची तुलना येथे माजी कॅरेबियन फलंदाज विव्हियन रिचर्ड्सशी केली आहे. गावस्कर म्हणाले की, विराट कोहली हा अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज मानला जातो कारण तो विव्ह रिचर्ड्ससारखाच फलंदाजी करतो आहे.

सुनील गावस्कर म्हणाले आहेत की – जेव्हा रिचर्ड्स क्रीजवर असायचा तेव्हा गोलंदाजांना त्याला रोखणे सोपे नव्हते आणि आजकाल विराट कोहलीदेखील अशीच फलंदाजी करतो आहे. विराट कोहलीच जलवा अजूनही चालूच आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत. एकदिवसीय सामन्यांत कोहलीने ४३ शतके आणि कसोटीत २७ शतके ठोकली आहेत. कोहलीची गुणवत्ता अशी आहे की त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य आहे.

गावस्कर यांनी असेही म्हटले आहे की – जर विराटची फलंदाजी पाहिली तर एका चेंडूला तो बॉटम हँडने मिड – विकेट ते मिड -ऑनच्या दिशेने बाउंड्रीच्या पार पोहोचवू शकतो,आणि अगदी त्याच चेंडूला तो टॉप हँडचा वापर करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार लगाव शकतो. म्हणूनच तो जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे जो व्हिव्ह रिचर्ड्स प्रमाणे नेमकी फलंदाजी करतो. गावस्करने विराटचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.