राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ बडा नेता मातोश्रीवर

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी  | कॉंग्रेस राष्ट्रवादीला लागलेले पक्षांतराचे  ग्रहण  थांबण्याचे नाव घेत  नाही असेच चित्र सध्या राज्यात पाहण्यास मिळते आहे. काल शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जावून उध्वव ठाकरे यांची भेट  घेतल्याने  राजकीय चर्चांना  उधान आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. असे झाल्यास तो राष्ट्रवादीला मोठा धक्का  असणार आहे.

जयदत्त  क्षीरसागर यांच्या मातोश्री भेटी वेळी त्यांच्या  सोबत भारतभूषण क्षीरसागर हे बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील मातोश्रीवर गेले होते. या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नोर्वेकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यात गुप्त बैठक पार पडली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

जयदत्त  क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. मागच्या दराने नेते होणाऱ्यांची राष्ट्रवादीत खूप चलती आहे असे जयदत्त क्षीरसागर उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे जयदत्त  क्षीरसागर  राष्ट्रवादीला रामराम घालणार यात काहीच दुमत दिसत नाही.

दरम्यान जयदत्त  क्षीरसागर आणि त्यांच्या पुतण्या मधील विस्तव विझण्याचे नाव घेत नाही. त्या विस्तवाला फुंकर घालण्याचे काम धनंजय मुंडे करत आहेत असे जयदत्त  क्षीरसागर यांचे मत बनल्याने ते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे  यांना पाठिंबा देण्याची भूमिका जयदत्त  क्षीरसागर  यांनी मागेच घेतली आहे. मात्र आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतची घोषणा १८ एप्रिलला करू असे  जयदत्त  क्षीरसागर यांनी मागेच सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!

‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट