हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला आहे. Dalberg-Kantarचा हा सर्वेक्षण अहवाल 5 एप्रिल ते 3 जून दरम्यान झालेल्या एकूण 47000 कुटुंबांच्या पाहणीवर आधारित आहे.
कोरोना कालावधीत कमाईपेक्षा कर्जाचे ओझे दोन तृतीयांश वाढले
Dalberg-Kantar यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवालात कोरोनामुळे कमी उत्पन्न असलेल्या गटात (एलआयजी) सर्वात वाईट परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे. या वर्गात, दर 4 पैकी 3 लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत. दर 5 पैकी 2 जण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. कोरोना कालावधीत मिळणाऱ्या कमाईपेक्षा कर्जाचा बोझा दोन तृतियांशांनी वाढला आहे ही वस्तुस्थिती देखील यातून पुढे आली आहे.
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील 80 टक्के लोक बेरोजगार झाले आहेत. तथापि, पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून काही मदत मिळाली आहे. पीडीएसमुळे 10 पैकी 9 लोकांना सरकारी रेशन मिळालं आहे. कॅश ट्रांसफरमुळे 14 टक्के लोकांना मदत झालेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.