नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अॅप टिकटॉक (TikTok) यासह अन्य चिनी अॅप्सवरील बंदी कायम आहे. भारत सरकारने सर्व अॅप्सना याबाबत नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका स्रोताने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्रालय (Ministry of Electronics and IT) ने ब्लॉक केलेल्या अॅप्सवरील प्रतिक्रियेचा आढावा घेऊन एक नोटीस पाठविली आहे.
टिकटॉक ने संपर्क साधला असता सरकारकडून नोटीस आल्याची पुष्टी केली आहे. टिकटॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की,”आम्ही या सूचनेचे मूल्यांकन करीत आहोत आणि योग्य प्रतिसाद देऊ. टिकटॉक ही 29 जून 2020 रोजी भारत सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करणार्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक होती. आम्ही स्थानिक कायद्यांचे आणि नियमांचे अनुसरण करण्याचा सतत प्रयत्न करतो आणि सरकारची कोणतीही समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आमच्या सर्व युझर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
गेल्या वर्षी जूनमध्ये, टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी (India Bans 59 Chinese Apps) घातली होती. यात टिकटॉक आणि यूसी ब्राउझर सारख्या अॅप्सचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत सरकारने या 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. या निर्णयाबद्दल केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, “आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार हे अॅप्स भारताच्या संरक्षण, सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी हानिकारक असलेल्या काही कामांमध्ये सामील आहेत”. यानंतर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 118 अन्य अॅप्सवर देखील बंदी घातली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.