Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Thursday, March 13, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक ‘या’ बँकेत सेव्हिंग अकाऊंट काढणाऱ्या करोडो खातेदारांना मोठा झटका
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

‘या’ बँकेत सेव्हिंग अकाऊंट काढणाऱ्या करोडो खातेदारांना मोठा झटका

By
Akshay Patil
-
Saturday, 13 June 2020, 4:08
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील दोन मोठ्या सरकारी बँका पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआय यांच्यानंतर आता आयडीबीआयने एक मोठा निर्णय घेत आपल्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केलेले आहेत. बँकेने आपल्या बचत बँक खात्यातील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी घट केली आहे. यापूर्वीच एसबीआयनेदेखील आपले व्याज दर कमी केलेले आहेत. जर एसबीआय ग्राहकांच्या खात्यात एक लाख रुपये जमा असतील तर ग्राहकाला एका वर्षात २.७५ टक्के या व्याज दराने २७५० रुपये व्याज मिळेल. भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) मोठ्या हिस्सेदारीची खरेदी केल्यानंतर आता आयडीबीआय बँक खासगी क्षेत्रातील बँक बनली आहे. जानेवारी २०१९ मध्ये एलआयसीने आयडीबीआय बँकेत ५१ टक्के हिस्सा खरेदी केला.

आयडीबीआय बँकेत झाला आणखी एक मोठा बदल
आयडीबीआय बँकेने म्हटले आहे की, अंशुमन शर्मा यांची शासकीय नामनिर्देशित संचालकपदी नियुक्ती करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे. ११ जून २०२० पासून त्यांची नियुक्ती प्रभावी होईल.

बँकेने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, संचालक मंडळाने पुढील आदेश येईपर्यंत ११ जून २०२० पासून आयडीबीआय बँक लिमिटेडच्या मंडळावर सरकारचे नियुक्त संचालक म्हणून अर्थ सेवा मंत्रालयाचे वित्तीय सेवा संचालक अंशुमन शर्मा यांच्या नियुक्तीस मान्यता दिलेली आहे.

पीएनबीनेही आपल्या बचत खात्यातील व्याजदर कमी केले आहेत
आता पीएनबीच्या बचत खात्यात ५० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ३ टक्के आणि ५० लाखांपेक्षा जास्त रकमेवर वार्षिक ३.२५ टक्के दराने व्याज मिळेल.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या बचत खात्याचा व्याज दर हा ०.२५ टक्क्यांनी कमी केलेला आहे. आयसीआयसीआय बँकेने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, ५० लाखाहून खाली असलेल्या सर्व ठेवींवर व्याज दर ०.२५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यानंतर हा दर ३.२५ वरून ३ टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आला आहे.

५० लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवरील व्याज दर ३.७५ वरून ३.५० टक्के इतका करण्यात आलेला आहे. बचत खात्यावरील या नवीन व्याज दर गुरुवार म्हणजेच ४ जूनपासून लागू होतील असे बँकेने म्हटले आहे.

इथे मिळत आहे बचत खात्यावर ७ टक्के व्याज
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बचत खात्याच्या ठेवीवर ६ टक्के वार्षिक व्याज, १ लाख ते १ कोटी रुपयांच्या ठेवींवर ६ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. आयडीएफसी बँकेने घरातच बसून खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे.

बंधन बँकेच्या बचत खात्यावर दररोज १ लाख ते १० कोटी रुपयांच्या रकमेवर ६ टक्के, १० कोटी ते ५० कोटी रुपयांच्या बॅलन्सवर ६.५५ टक्के आणि ५० कोटींपेक्षा जास्त रकमेवर ७ टक्के व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यात १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील व्याज दर ६.२५ टक्के आहे. १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत व्याज दर ६ टक्के. त्याचबरोबर १० लाखाहून अधिक ठेवींवर ७ टक्के व्याज दर आहे.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यास ७ टक्के व्याज मिळत आहे. १ लाख ते १० लाख रुपयांवरील ठेवींवर ६.५० टक्के आणि १० लाख रुपयांवरील ठेवींवर ७ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

  • TAGS
  • Bank
  • Banking
  • economic package
  • economics
  • Economy
  • icici
  • icici bank
  • IDBI Bank
  • Indian Economy
  • interests
  • latest news
  • loan
  • news
  • PNB
  • Punjab National Bank
  • rbi
  • Reserve bank of india
  • Saving Account
  • SBI
  • State Bank of India
  • आयसीआयसीआय बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
Previous articleकोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात
Next articleकोरोनावर हे औषध रामबाण उपाय; पण भारतासमोर ‘या’ अडचणी
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Amrut Kalash FD Scheme

SBI ची जबरदस्त योजना! कमी कालावधीत मिळेल भरघोस परतावा; 31 मार्चपर्यंत घेता येणार लाभ

EPFO

होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO कडून या महत्त्वाच्या योजनेत बदल; होणार हे फायदे

PM Kisan Yojana

वंचित शेतकऱ्यांसाठी पुन्हा पीएम किसान योजनेच्या नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात; सरकारचा निर्णय

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp