बर्ड फ्लूचा कहर! चिकन बंदीनंतर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने होतोय मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पोल्ट्री फार्म (Poultry) मालकांवर चोहो बाजूने संकट ओढवले आहे. पहिले कोरोना आणि आता बर्ड फ्लू. बर्ड फ्लूमुळे देशातील 8 राज्यात चिकनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता कोंबड्यांवर बंदी येताच, आता चिकन म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) ने मरण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्याचे वजन हे त्यामागील मुख्य कारण आहे. अडीच किलो वजनानंतर कोंबडीला अनेक समस्या येण्यास सुरवात होते. तसेच बंदी घातल्यामुळे कोंबडा सध्या बाजारात जात नाही. पोल्ट्रीमध्ये धान्य खाल्ल्यानंतर तिचे वजन वाढत आहे.

पोल्ट्री एक्सपर्ट अनिल शाक्य न्यूज 18 हिंदीला म्हणाले,’जेव्हा ब्रॉयलर जातीची कोंबडी किंवा कोंबडा 15 दिवसांची असते तेव्हा तिचे वजन 500 ते 600 ग्रॅम असते. 30 दिवसांनी, ते 1.25 किलो होते. 30 दिवसानंतर या जातीमध्ये कोंबड्यांचा डोस वाढवला जातो. तेव्हा ते अधिक धान्य खाऊ लागतात. म्हणूनच पुढचे 5 दिवस म्हणजे 35 दिवसांत 2 किलो वजन गाठले जाते आणि 40 दिवसांनी ते 2.5 किलो पर्यंत होते.

https://t.co/1fDpCyYKwO?amp=1

बाजारात अडीच किलोपर्यंत कोंबडीची मागणी आहे. पण यानंतर, ते विकले जाण्याची हमी नसते. तसेच जस्ट वजनामुळे कोंबड्या व्यवस्थित हलू शकत नाही. हालचाल नसल्यामुळे ते पूर्णपणे खाण्यास आणि पाणी पिण्यास असमर्थ ठरतात. एकाच जागी पडून पडून ते मरू लागतात. त्यांना हृदयविकाराचा झटका येतो, जो आता या जातीमध्ये येत आहे.

https://t.co/mgmFxkFrUY?amp=1

दर आणि मागणी वजनानुसार ठरविली जाते
गाझीपूर मंडीमध्ये रचना पोल्ट्री या नावाने कोंबडीचा व्यवसाय करणारा जमील म्हणतो की साधारणत: 900 ग्रॅम ते 1.25 किलो वजनाची कोंबडी तंदुरी चिकन बनवण्यासाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे, 1400 ग्रॅम ते 1700 ग्रॅम ते चिकन मध्यम आणि 2.5 किलो जाड या श्रेणीत येतात. अडीच किलोची कोंबडी बहुतेक कोरमा बनवण्यासाठी वापरली जाते.

https://t.co/G87874jFHN?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment