महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार. अस ट्विट अतुल भातखलकर यांनी केलं आहे

ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. होळी हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. मर्यादित संख्येत उपस्थित राहून आज मुंबई भर प्रत्येकाने होळी साजरी करावी अस आवाहन अतुल भातखलकर त्यांनी यावेळी केल. आणि हिंमत असेल तर ठाकरे सरकारने आमच्यावर कारवाई करून दाखवावी अस खुलं आव्हान त्यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिलं.

राम कदम आक्रमक –

दरम्यान यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवाल राम कदम यांनी केला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group