हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला रेमडेसिव्हर द्याल तर परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या आरोपाला भाजप नेते अतुल भातखलकर यांनी थेट प्रत्युत्तर देत नवाब मलिक याना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
अतुल भातखलकर यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा.
'महाराष्ट्राला रेमदेसीवीर पुरवली तर खबरदार' अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली म्हणे!
नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा. pic.twitter.com/jewbXvsubu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे खोटारडेपणा आणि बेशरमपणाचा कळस आहे. नवाब मलिक यांनी या आरोपाचे पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे अतुल भातखलकर यांनी म्हंटल. ऑक्सिजन चा तुटवडा, बेडचा तुटवडा आणि रेमसेसिविर चा तुटवडा असताना यांचे मंत्री बिळात बसले आहेत असेही अतुल भातखलकर यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.