कोल्हापूर प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील आपल्या विधानाने नेहमी चर्चेत राहतात. असेच एक विधान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा दरम्यान सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या मागणी नंतर चंद्रकांत पाटील यांचा माथा भडकला आणि त्यांनी ए गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यांच्या कृत्यानंतर भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे.
राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष ; त्या निनामी पत्राने राष्ट्रवादीमध्ये खळबळ
पुराचे पाणी आता कमी होत आहे. त्यामुळे आता आपण जनावरांच्या उपजीविकेसाठी त्यांना उसाची वैरण उपलब्ध करून देत आहोत. तसेच गाडगीळांनी दोन ट्रक पेंढ देखील दिली आहे. ती हि आता पाणी कमी झाल्या बरोबर आणली जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणत होते. त्याच दरम्यान एका शेतकऱ्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. त्यावेळी त्या शेतकऱ्याला चंद्रकांत पाटील यांनी ए गप्प बस…. गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच सर्वच स्तरातून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेद केला जातो आहे.
त्या व्हायरल फोटोवर जयंत पाटील यांनी दिले हे स्पष्टीकरण
दरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हळूहळू निवळत चालली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच स्वच्छता आणि साथीच्या रोगापासून निफटारा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर
महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील
पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी