हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा दणदणीत पराभव केला. यामुळे महाविकास आघाडीत जोरदार धक्का बसला. तिन्ही पक्ष एकत्र येऊन देखील भाजपने बाजी मारल्यानंतर भाजप नेत्यांना उत्साह वाढला आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केले. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी टीका केली.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. असे फडणवीस यांनी म्हंटल. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं”, असं फडणवीस म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.