मराठी माणूस माफ करणार नाही; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “ऐंशीच्या दशकात ज्यांनी गिरणी कामगार संप मोडीत काढले तेच आता एसटी संप चिरडून टाकताहेत. तेंव्हा गिरणीच्या जागांवर डल्ला मारला आताही एसटीचे भूखंडाचं ‘श्रीखंड’ खाण्यावर डोळा. मराठी माणूस माफ करणार नाही,” अशी टीका वाघ यांनी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ऐंशीच्या दशकात ज्यांनी गिरणी कामगार संप मोडीत काढले तेच आता एसटी संप चिरडून टाकताहेत. तेंव्हा गिरणीच्या जागांवर डल्ला मारला
आताही एसटीचे भूखंडाचं ‘श्रीखंड’ खाण्यावर डोळा. मराठी माणूस माफ करणार नाही. तुम्हाला खाऊ देणार नाही. खाऊसेनेचे ३ सरदार होतोय भूखंडाचा अपहार जबाबदार महाविकास आघाडीचे सरकार,” असे वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यापूर्वीही ट्विट करीत ठाकरे सरकार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केली होती. परब यांनी एकेकाळी म्हंटले होते कि आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. अनिल परबजी, किती खोट्या शपथा अन् वचनं घेणार आहात. थोडी फार उरली असेल तर शब्दाला जागा. तुम्ही आपल्या शब्दावरून पलटी मारताय. शब्द न पाळणारं.पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे, अशी घणाघाती टीका वाघ यांनी केली होती.

Leave a Comment