हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीवर मधील तिन्ही पक्ष भाजप विरोधात उभे होते. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिले आहे, असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत भाजपाच्यावतीने निर्णय घेण्यात आला होता की, आमचे स्थानिक नेतृत्वाकडून निवडणूक लढवली जाईल. विशेष म्हणजे तिन्ही पक्षातील नेत्यांप्रमाणे आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची जागा खाणार आहे. त्यामुळे कोण रसातळाला चाललंय हे निवडणुकीतून स्पष्ट झाले. त्याचा विचार त्यांनी करावा,
225 जागांपैकी 55 जागा म्हणजे 25 टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. 25 टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या 50 टक्क्यात ते 3 पक्ष अडकले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरात टक्कर झाली. पक्षांतील उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. यानंतर भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लबोलही केला आहे.