विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत फडणवीसांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या नियमात बदल करण्यात आल्याने याला भाजप नेत्यांनी अधिवेशनात विरोध केला. आता दोन दिवसांच्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याने याबाबात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत्वाचे विधान केले आहे. अधिवेशनास दोन दिवस बाकी आहे. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांच्या लसीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल मोदींचे आभार मानले. नंतर ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत आता राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपालच जो काही आहे तो निर्णय घेतील. मात्र, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेले आहेत ते भारतीय संविधानाला सुसंगत दिसत नाहीत. केवळ याच कारणामुळे आम्ही अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेपही घेतला होता. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही या निवड प्रक्रियेस विरोध करत आहे.

यावेळी फडणवीसांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याने या विषयावरून राज्य सरकावर निशाणा साधला. यावे ते म्हणाले अगोदरच दोन दिवसाचे अधिवेशन बाकी राहिले आहे. आणखी गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार? सुरुवातीलाच पाच दिवसाचे अधिवेशन ठेवणे म्हणजे अधिवेशन गुंडाळण्याचा सारखे आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकावर टीका केली.