एकेकाळी फडणवीसांची शिफारस मीच केली होती, त्याचीच आज शिक्षा भोगतोय- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्यातील पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशा वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती त्याचीच आज शिक्षा मी भोगतोय, अशी खदखद प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भूतकाळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली होती. आपल्या नावाची शिफारस करावी म्हणून फडणवीस महिनाभर माझ्या बंगल्यावर चकरा मारत होते. त्या माझ्या शिफारशीची शिक्षा आज मी भोगतोय, अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली.

आम्हाला डावलून इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवाल करत हा सर्व प्रकार पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे असं खडसे म्हणाले. त्यांच्याकडून समाधान नाही झालं तर पुढचा निर्णय घेईल. पण पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण संपर्क होत नाही. माझा काय दोष आहे? मी काय चूक केली? असं मला फडणवीसांना विचारायचं आहे. माझी जर काही चूक असेल तर माफी मागायलाही तयार आहे, असंही ते म्हणाले.

हे सर्व पूर्वनियोजित होतं
याचबरोबर संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

काँग्रेसची ऑफर
विधान परिषदेसाठी मला काँग्रेसने ऑफर दिली होती असा . माझ्यासाठी भाजपमधील ७-८ आमदार क्रॉस व्होटिंगही करायला तयार होते. पण वेळ फार कमी होता. त्यामुळे मी काँग्रेसला नकार दिला, असं सांगतानाच करोनाचं संकट टळल्यानंतर माझ्या १७-१८ समर्थक आमदारांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment