हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारचा निधी हा ज्या ठिकाणी जास्त बिबटे आहेत अशा सिन्नरमध्ये, शिरूरकडे यायला हवा आहे. मात्र, काका-पुतण्यांनाही 1 हजार कोटी पैसे कुठे नेले तर बारामतीला. त्या ठिकाणी एकही बिबट्या नाही. मग याला चोरी म्हणायची नाही तर काय म्हणायचे. हा चोरीचाच प्रकार आहे ना. सत्तेत असताना तुम्ही राज्य सरकारचे हजार कोटी रुपये नेता. तुमच्याकडे तिजोरीची चावी दिली म्हणून तुम्ही सर्व तिजोरीत गडप करत आहात.
शरद पवार यांनी 50 वर्षे राज्य केलं. मात्र, विकास काही केला नाही. आपलं सरकार आल्यानंतर फलटण ते बारामती असा रस्ता झाला. त्यावेळेला सरकार नव्हते. केंद्र सरकार नव्हते. सर्व होतं पण याची नियत साफ नव्हती. यांच्याकडे दूरदृष्टी न्हव्हती. यांना फक्त महाराष्ट्रातील लोकांचं रक्त शोषायच होत. आणि जाणता राजा. कुठला जाणता राजा? हा तर नेणता राजा आहे. यांनी या महाराष्ट्रातील कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला नाहीमी अशी टीका पडळकरांनी केली.
पवारांनी कधी कुस्ती, कबड्डी खेळली आहे का?
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली यावरून पवार कुटूंबियांवर निशाणा साधला. “शरद पवार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कुस्ती खेळली? अजितदादा कबड्डीचे अध्यक्ष त्यांनी कबड्डी खेळली का? सुप्रिया सुळे खो-खो अध्यक्ष होत्या, त्या कधी खेळल्या का? रोहित पवार क्रिकेटचा अध्यक्ष, त्याला क्रिकेट खेळता येतं का? रोहित पवारला एक मॅच खेळायला लावा, 5-10 रन केले तर, ठेवा,’ अशी टीका पडळकरांनी केली.