शकुनी काकांचा 2 हजार कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महा विकास आघाडी सरकार मधील नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मागील सहा महिन्यापासून एसटी, कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण शकुनी काकांनी आता याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक गिळंकृत करण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केली आहे.

पडळकर यांनी आज त्याच्या अधिकृत ट्विटरअकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण शकुनी काकांनी आता याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक गिळंकृत करण्याचा डाव आखलाय.अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.”

https://www.facebook.com/watch/?v=737936607209330

एसटी बँकेने निवडणूकीची घोषणा केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला आहे. सहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. 1995 ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले.

त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली 500 रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम गोळा केली. अशा वेगवेगळ्या मार्गाने जवळपास 100 कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना 20-20 लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या, असा आरोप पडळकरांनी केला आहे.

Leave a Comment