अनिल देशमुखांना आता शंभर दिवस ईडीच्या कस्टडीत राहावे लागणार – किरीट सोमय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर झाले. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. “अखेर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले, 100 दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा 100 कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेना किती? हे सांगावे लागणार,” असे सोमय्या म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्याबाबत ट्विट करीत निशाणा साधला. सोम्या यांनी म्हंटले आहे की, “अखेर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले. आता देशमुखांना 100 दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा 100 कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेना किती? हे सांगावे लागणारच. पहिली अटक जितेंद्र आव्हाडांची झाली आता अनिल देशमुखची होणार आणि पुढे नंबर आता अनिल परब यांचा लागणार.”

अनिल देशमुख यांना आता दर महिन्याला किती कोटी? आणि कुणाला किती कोटी पैसे पाठवले हे ईडीच्या चौकशीमध्ये सांगावेच लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले. किरीट सोमय्या यांनी मनी लॉंड्री प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची चौकशी लावली आहे. त्यामध्ये सोमय्या यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment