हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार यांच्या खात्यावर शेकडो कोटी रुपये आले आहेत. हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर येऊन उत्तर द्यावे. नाहीतर बाईलवेडा बंद करावा, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आले आहेत अनेक बिल्डरांकडून. ते पवारांनी आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर पाठवले आहेत. आयकर विभागानंतर ईडीच्या धाडी पडल्या. १९ दिवस झाले या धाडी चालू आहेत. हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची बेनामी संपत्ती बाहेर आलेली आहे. शरद पवार यांना वाटत असेल हि आपली चोरी पकडली जाणार नाही. तर त्यांना एवढेच सांगू इच्छितो कि गेल्या १९ दिवसात पवार कुटुंबीयांचा सातबारा आम्ही त्यांच्या हातात दिला आहे.
या सर्व प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे पवारांनी त्यांचा पपलू नवाब मलिक यांना बाहेर काढून समीर वानखेडे यांच्या आरोपाचे बारा दिवस प्रकरण चालवले. नवाब मलिक यांना एक विचारतो कि, समीर वानखडे यांच्यावर तू दलित नाही तू मुस्लिम आहे. मुस्लिम नाही तू हिंदू आहे. हि अशा प्रकारची नौटंकी कशासाठी? आता एक वेगळं काढलं आहे. फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस. हे सांगण्या अगोदर मलिकांनी पहिल्यांदा उत्तर द्यावे की, अजित पवारांनी एक हजार पन्नास कोटींची बेनामी संपत्ती पवार परिवाराच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले? याचे उत्तर ठाकरे पवारांना द्यावेच लागणार आहे, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली आहे.