हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी यांनी पवार व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. “राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. सत्ताधारी माफिया राज चालवित आहेत, सत्ता प्रस्थापित होऊन दोन वर्षे होत आले असल्याची टीका मुंडेंनी केली आहे.
बीड येथे एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्स्थिती लावली. यावेळी त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता. पालकमंत्री मुंडेंनी जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नये. माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. मुंडे साहेब दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाही, त्या मुंडे साहेबांचे रक्त आमच्या अंगात आहे. दसऱ्याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, असा इशारा मुंडेंनी दिला.
सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणे हे आमचे विरोधी पक्ष म्हणून दायित्व आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, असा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.